अटी, शर्तीवर व्यापारपेठ सुरू

भवानीनगर (वार्ताहर) – भवानीनगर परिसरामध्ये सोमवार (दि. 13) पासून सकाळी 10 ते सायंकाळी पाचपर्यंत दुकाने खुली ठेवण्यात आली. बैठकीत ठरलेल्या अटी, शर्तीनुसार व्यापाऱ्यांनी आज आर्थिक उलाढाल केली आहे.

व्यापाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी माजी उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, नानासाहेब निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते धनंजय गायकवाड, विक्रम निंबाळकर यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. सकाळपासून ग्राहकांची गर्दी दिसत होती.

दुकानासमोर ग्राहकांमध्ये डिस्टन्स ठेवून साहित्यांची विक्री करण्यात आली. शनिवारी व रविवारी दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. यावेळी व्यापारी जगतराम कपूर, रमेश काळे, अमोल भोईटे, दिगंबर मदने, सचिन भोईटे, दीपक होणराव, हनीफ तांबोळी, गणेश शितोळे, दीपक नेवसे, अभिनंदन दोशी, शुभम संचेती, व्यापारी, पदाधिकारी यांच्या समन्वयातून व्यापारपेठेचे अर्थचक्र सुरू झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.