बॉलीवूड खिलाडी कुमार अक्षय कुमार गेल्या वर्षी 2022 मध्ये पान मसालाच्या जाहिरातीमुळे खूप चर्चेत होता. या जाहिरातीमुळे अक्षय कुमारला ट्रोलचा सामना करावा लागला. जाहिरातीमुळे तो वादातही राहिला. तंबाखूच्या ब्रँडची जाहिरात केल्याबद्दल लोकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. यामुळे त्याला चित्रपटांमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागले होते, त्यानंतर अक्षयने स्वत: लोकांची माफी मागितली आणि पान मसालासोबतचा संबंध संपवल्याची चर्चा झाली. अशात आता त्यांनी दिलेले वचन पूर्ण केले आहे. तो त्यापासून पूर्णपणे वेगळा झाला आहे.
दरम्यान, अक्षय कुमार शेवटचा 2022 मध्ये शाहरुख खान आणि अजय देवगणसोबत एका पान मसाला जाहिरातीत दिसला होता. या जाहिरातीमुळे तिन्ही स्टार्स ट्रोलच्या निशाण्यावर आले होते. त्याच्यावर बरीच टीका झाली. त्याचे अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर अक्षयनेही माफी मागणारी पोस्ट लिहिली. त्याने तंबाखूच्या जाहिरातीत काम केले नाही तर विमल इलायचीच्या जाहिरातीत काम केले. त्यावेळी अभिनेत्याने ठरवले होते की, त्यातून मिळणारी संपूर्ण फी उदात्त कारणांसाठी खर्च करायची. अशात त्याच्यासोबतचा अभिनेत्याचा करार पूर्णपणे संपुष्टात आला आहे.
अक्षय कुमार आता विमल इलायचीच्या जाहिरातीत दिसणार नाही. त्याने कंपनीसोबतचा संबंध संपुष्टात आणला आहे. आता यात शाहरुख आणि अजय देवगण हे दोनच सेलिब्रिटी दिसणार आहेत.
अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो ‘हाऊसफुल 5’ साठी चर्चेत आहे. 6 जुलै 2025 रोजी रिलीज होणार आहे. अलीकडेच अक्षयने साजिद नाडियादवाला यांचे वक्तव्य शेअर करून चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती. याशिवाय तो टायगर श्रॉफसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटातही दिसणार आहे.