Akshay Kumar| अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यातच आता एका मुलाखतीमध्ये अक्षयने त्याच्यासोबत घडलेला एक अनुभव शेअर केला आहे.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने एका मुलाखतीसाठी हजेरी लावली होती. या वेळी दोघांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. एका चाहत्याबाबत त्याच्यासोबत घडलेली घटना अक्षयने सांगितली. “एकदा चाहत्यांची फार गर्दी होती आणि मी त्यांच्याशी हात मिळवत होतो. तेव्हात मी पाहिलं की माझ्या हातातून रक्त येत आहे. त्याच्यांपैकी एकानं हाताच्या नखात ब्लेड ठेवलं होतं आणि त्यामुळे हात कापला होता.” Akshay Kumar|
दरम्यान, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ विषयी बोलायचे झाले तर, दोघे त्यांच्या ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ते सगळीकडे जोरदार प्रमोशन करत आहेत. त्याशिवाय सोशल मीडियावर मजेशीर रील करताना देखील ते दिसत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफशिवाय मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ आणि पृथ्वीराज सुकुमारन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. Akshay Kumar|
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट येत्या बुधवारी १० एप्रिल रोजी हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
’10 वर्षे यश मिळाले नाही तर ब्रेक घेण्यात काही गैर नाही’; प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना सल्ला