गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड कलाकारांचे डीप फेक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रश्मिका मंदाना, कटरीना कैफ आणि नोरा फतेहीसह अनेक कलाकारांचे डीप फेक व्हिडिओ समोर आले आहे. अशात अक्षय कुमारचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रिपोर्ट्सनुसार अक्षयने कधीही अशा प्रकारची कुठलीही जाहिरात केलेली नाही. आता या व्हिडिओचा पोलिसांकडून तपास केल्या जात आहे. या फेक व्हिडिओ आणि कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर AI-जनरेटेड डीप फेक व्हिडिओमध्ये अक्षय कुमार म्हणाला,’ तुम्हालाही खेळायला आवडते का? मी तुम्हाला हे ॲप डाउनलोड करण्याची आणि एव्हिएटर गेम वापरण्याची शिफारस करतो. हा जगभरातील लोकप्रिय स्लॉट आहे जो प्रत्येकजण येथे खेळतो. आम्हाला कॅसिनोविरुद्ध खेळायचे नाही, तर इतर खेळाडूंविरुद्ध खेळायचे आहे. मी स्वत: गेल्या एक महिन्यापासून दररोज प्रत्येक खेळ खेळत आहे.’
हा व्हिडिओ समोर आल्यापासून आहे. त्यांनी आपल्या टीमला या प्रकरणावर लक्ष ठेवून कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे. वर्क फ्रंटवर, अक्षय ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ रिलीजच्या तयारीत आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘स्काय फोर्स’, ‘सिंघम अगेन’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हेरा फेरी 3’ सारखे चित्रपट आहेत.