पुणे : पुणे शहरासह राज्यभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीच्या सन्मानार्थ संपूर्ण मालुसरे परिवाराच्या वतीने आम्ही चालवू पुढे हा वारसा या उपक्रमा अंतर्गत पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली.
संपूर्ण मालुसरे परिवाराच्या वतीने ‘नरवीर तानाजी मालुसरे शौर्य गौरव पुरस्कार’ पुणे शहरासह राज्यभरात विविध क्षेत्रात ज्याचे काम सर्वश्रुत आहे अशा व्यक्तींना तसेच परिवाराला देण्यात येणार आहे.
दरम्यान, या उपक्रमाच्या शुभारंभाच्यावेळी, “आपण सुरु केलेल्या या उपक्रमाला आपण सर्वतोपरीने कायम मदत करत राहू” असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले. दरम्यान, या कार्क्रमासाठी पुणे अर्बन बँकेचे अध्यक्ष निलेश आण्णा ढमढेरे, सुशांत ढमढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नरवीर तानाजी मालुसरे शौर्य गौरव पुरस्कार, मालुसरे पगडी, चांदीचे कडे, चांदीचे तोडे, साडी, सोन्याची नाथ, शेला, सन्मान पत्र, नरवीर तानाजी मालुसरे प्रतिकृती सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे अशी माहिती बाळासाहेब मालुसरे (उपशहर प्रमुख – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे शहर ) यांनी दिली आहे.