कुडजे – रविवार दिनांक 18 डिसेंबर रोजी कुडजे गावातील काळूबाई मंदिर परिसरामध्ये असलेल्या शेतात शरद पायगुडे आणि मारुती मारणे हे ज्वारीची राखण करत होते. दरम्यान दुपारच्या वेळेस रान गव्याने एन. डी. ए च्या हद्दितून शेतामध्ये प्रवेश केला आणि चारा खात असलेल्या बैलावर हल्ला केला. त्या हल्ल्यात शरद यांच्या दोन वर्षाच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. शरद हे पंचकृशितील प्रगतशील शेतकरी आहेत.
या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील दत्ता पायगुडे यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट दिली आणि घटनेची माहिती वनविभाग आणि पोलीसांना दिली. तसेच शरद यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे, असे पोलीस पाटील यांनी सांगीतले.
दरम्यान रानगव्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी तेजस मांजरे, अमीत गायकवाड, रमेश मारणे, विशाल मांजरे, राजेंद्र पायगुडे, शरद पायगुडे हे शेतकरी उपस्थित होते.