मुंबई: आज विधानसभेत सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा झाली. अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर सन्माननीय सदस्यांकडून तारांकित प्रश्नांच्या तासाला प्रश्न उपस्थित केले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी उपस्थित प्रश्नांची उत्तरे दिले. दरम्यान अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली.
अजित पवार म्हणाले, ‘मी काहीच लपून-छपून करत नाही. तिकडेही उघडपणे गेलो आणि उपमुख्यमंत्रीपद घेतले आणि इकडेही उघडपणे आलो आणि उपमुख्यमंत्री झालो, असे दिलखुलासपणे अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. त्यांच्या उत्तरानंतर सभागृहातील सदस्यांमध्ये हशा पिकला.’