करोनामुळे आशिया इलेव्हन स्पर्धा अखेर रद्द

मुंबई – चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूंमुळे क्रीडा क्षेत्राला चांगलाच फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता बांगलादेशमध्ये होणारी आशिया इलेव्हन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. याचसोबत २९ मार्चपासून सुरु होत असलेली आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने पुढे ढकलली असून आता ही स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे.

तसेच, दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा देखील करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेला आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. मालिकेतील उर्वरीत सामने 15 मार्च आणि 18 मार्च रोजी अनुक्रमे लखनौ आणि कोलकाता येथे होणार होते.

दरम्यान, करोनाचा प्रसार अनेक देशांत झालेला आहे. सध्या भारतात करोना विषाणूचे अनेक रुग्ण सापडत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरीने प्रयत्न करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.