‘हे फडणवीस सरकार की, फसणवीस सरकार’ – अजित पवार

मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी अजित पवारांची भेट

मुंबई – आझाद मैदान येथे मराठा समजाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या . मराठा समाजाच्या मेडिकल प्रवेशासाठीच्या 250 विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार असूनही असं होणं,हे सरकारचं अपयशच! चुकीच्या धोरणामुळेच या विद्यार्थ्यांना फटका बसलाय. मग “हे फडणवीस सरकार की, फसणवीस सरकार” हा या मुलांचा प्रश्न चुकीचा ठरतो का? असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे. या विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला? असा सवाल यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला.

तसेच या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजच राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मराठा समाजातील मुलांच्या वैद्यकीय प्रवेश सवलतीचा तिढा सुटलेला नाही. याच कारणामुळे मराठा समाजातील विद्यार्थी आझाद मैदानावर आंदोलन छेडलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.