Meera borwankar – महाराष्ट्राच्या लेडीकॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera borwankar) यांचं ‘मॅडम कमिश्नर’ (Madam Commissioner Book) हे पुस्तक रविवारी 15 ऑक्टोबरला प्रकाशित झालं आणि राज्यभरात खळबळ उडाली.
बोरवणकरांच्या पुस्तकाची सध्या चर्चा चालु झालीये कारण त्यांनी या पुस्तकात अजित पवाराचं (ajit pawar) थेट नाव न घेता ‘पुण्याचे मंत्री दादा’ असा उल्लेख करत पुणे पोलिसांच्या मालकीची असलेल्या येरवडा (Yerawada) कारागृहाच्या जमिनीबाबत करण्यात आलेल्या व्यवहारासंदर्भात आरोप केलेत.
‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात एकूण 38 प्रकरणे आहेत. त्यापैकी केवळ एका प्रकरणाची चर्चा करुन सनसनाटी निर्माण केली जात असल्याचं सध्या दिसून येत आहे. दरम्यान, कालपासून सुरु असलेल्या या चर्चांवर आता स्वतः मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे.
यावेळी त्या म्हणाल्या, “या पुस्तकात अनेक प्रकरणे आहेत. एकतर्फी प्रेमात तरुणीची झालेली हत्या, जळगाव सेक्स स्कँडल, मानवी तस्करी अशी विविध प्रकरणे या पुस्तकात आहेत. एकाच प्रकरणाबद्दल मला विचारणा करू नका. हे पुस्तक प्रशासन, उत्कृष्ट तपास, मुली-महिलांचे शोषण अशा विविध मुद्यांवर आहे. असं त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, “या प्रकरणी कालपासून अनेक फोन येत आहे. एक लिलावाची प्रक्रिया झालेली होती. एक बिल्डर तुम्हाला भेटतो तो म्हणतो की माझी जागा इथे आहे आणि तिथे आहे. मध्ये पुणे पोलिसांची जागा. तो बिल्डर म्हणतो की येरवडा पोलिसांची जागा मला द्या.
याबाबत पुणे पोलिसांनी त्याला विरोध केलेला होता. बिल्डरला जागा देऊ नका अशी भूमिका होती. पुणे पोलिसांची जागा द्यायची न्वहती कारण त्यावेळी दोन अतिरिक्त आयुक्तांना कार्यालयं नव्हती. पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न असल्यानं ती जागा देऊ नये, अशी माझी भूमिका होती, असं मीरा बोरवणकर म्हणाल्या.
अजित पवार यांचं नाव घेतलेलं नाही….
“अजित पवार (ajit pawar) यांनी लिलाव केला नाही, हे सत्य आहे. पुणे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीच्या लिलावासाठी सरकारने एक समिती नेमली होती. त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली. माझ्याकडे कार्यभार असल्याने ही जमिनीवरील ताबा सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती. अजित पवारांनी देखील हाच आग्रह धरला होता.
लिलाव झाल्याने आता हस्तांतरण प्रक्रिया सुरू करा असे त्यांनी म्हटले. मात्र, माझ्या दृष्टीने ती जागा महत्त्वाची होती. कारण दोन अतिरिक्त आयुक्तांना कार्यालयं नव्हती. पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न असल्यानं ती जागा महत्वाची होती. त्यामुळे मी त्या तीन एकर जमिनीच्या लिलावाला आक्षेप घेत हस्तांतरणाला विरोध केला’ असल्याचे बोरवणकर यांनी म्हटले आहे.