नवी दिल्ली – फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने प्लॅटफॉर्म फी वाढवली असून फूड डिलिव्हरी ऑर्डरवर प्लॅटफॉर्म फी 2 रुपयांवरून 3 रुपये केली आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या आठवड्यात Swiggy ने Rs 99 चा एक स्वस्त मेंबरशिप प्लॅन, One Lite मेंबरशिप लाँच केला होता, ज्याची सदस्यता घेतल्यानंतर ते फ्री डिलिव्हरीसह अनेक सुविधा पुरवणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या, प्लॅटफॉर्म फी फक्त स्विगीच्या फूड डिलिव्हरी सेवेवर लागू आहे, इंस्टामार्ट ऑर्डरवर नाही. एप्रिलमध्ये, कंपनीने प्रति ऑर्डर 2 रुपये प्लॅटफॉर्म फी लागू केली होती.
प्लॅटफॉर्म फीमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल नाही –
स्विगीच्या प्रवक्त्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले की, प्लॅटफॉर्म फीमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. इंडस्ट्रीमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. आम्ही ज्या शहरांमध्ये काम करतो त्या बहुतांश शहरांमध्ये सध्या प्लॅटफॉर्म फी 3 रुपये आहे.
झोमॅटोनेही ऑगस्टमध्ये वाढवली प्लॅटफॉर्म फी –
ऑगस्टमध्ये, स्विगीचा प्रतिस्पर्धी झोमॅटोनेही प्लॅटफॉर्म शुल्क सुरुवातीच्या 2 रुपयांवरून 3 रुपये प्रति ऑर्डर वाढवले आहे. झोमॅटोने झोमॅटो गोल्ड वापरकर्त्यांकडून प्लॅटफॉर्म शुल्क आकारण्यास सुरुवात केली, ज्यांना पूर्वी सूट देण्यात आली होती.
One Lite सदस्यत्वामध्ये 3 महिन्यांसाठी मोफत डिलिव्हरी –
नुकतेच Swiggy ने त्याच्या ग्राहकांसाठी 3 महिन्यांसाठी 99 रुपयांच्या किमतीत वन लाइट मेंबरशिप सुरू केली आहे. वन लाइट सदस्यत्वासह, वापरकर्त्यांना 149 रुपयांपेक्षा जास्त फूड ऑर्डरवर 10 मोफत डिलिव्हरी मिळतील, तसेच 199 रुपयांपेक्षा जास्त इंस्टामार्ट ऑर्डरवर 10 मोफत डिलिव्हरी मिळतील. मोफत डिलिव्हरी व्यतिरिक्त, सदस्यांना 20 हजारांहून अधिक रेस्टॉरंटमध्ये नियमित ऑफरसह 30 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळेल. कंपनीने सांगितले की, One Lite सदस्यांना 60 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्विगी जिनी डिलिव्हरीवर 10% सूट मिळेल.