Lok Sabha Election 2024 । भाजपने नुकतीच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. या यादीमध्ये अनेक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार यांना तिकीट देण्यात आले त्यामुळे महायुतीतील अजित पवार गटाचे नेते यांनी नाराजी दर्शवली आहे. अशात डॉ. सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात आली. त्याच दिवशी अजित पवार गटाचे निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश घेतला.
अशात आता अजित पवार गटातील पुन्हा एका नेत्याने नाराजी व्यक्त करत केली आहे. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा मार्गवार आहे. रवींद्र पाटील शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईत पोहचले आहे.
रवींद्र नाना पाटील हे जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी आहे. अशातरवींद्र नाना पाटील सिल्व्हर ओकवर जावून शरद पवार यांची भेट घेणार आहे. यावरून ते लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
रवींद्र नाना पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रावेर लोकसभा संघातून उमेदवारी देण्याची ऑफर आली आहे. शरद पवार गटाकडून ऑफर आल्याची रवींद्र नाना पाटील यांनीच वृत्तवाहिनी बोलताना सांगितले. यामुळे येत्या दिवसात ते शरद पवार गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचाल का ? एकनाथ शिंदे नव्हे तर शिवसेनेतील हा नेता ‘भावी मुख्यमंत्री’; वाचा