Eknath Shinde । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यावरून शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे.
शिंदे गट, अजित पवार गट नेत्यांकडून जागावाटपाच्या मुद्यावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात महायुती सरकार यात शिवसेना तसेच राष्ट्रवादी मधील फूट आणि राजकीय गणिते ऐन लोकसभा निवडकीच्या तोंडावर बदलतांना दिसत आहे.
अशात लोकसभेनंतर काही दिवसातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदारांची नावे आणि बॅनर चर्चेत आहे .
अशात विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणखी एका व्यक्तीचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी पुढे आणले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहे. यामुळे राजकीय चर्चांना जोर आला आहे.
पुण्यातील कात्रज चौकातपरिसरात शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहे. संघर्ष सेनेचे संतोष साठे यांनी तानाजी सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना तानाजी सावंत यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री केला आहे. त्यांनी पुणे शहरात लावलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.
पुणे शहरात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. अजित पवार यांनी आपली महत्वकांक्षा मुलाखतीच्या माध्यमातून आणि जाहीर भाषणांमधून बोलून दाखवली आहे.
हे वाचाल का ? PM मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण?