BARAMATI : बारामती आणि गोविंदबागेत (Govindbaug) साजरी होणारी दिवाळी हा राज्यभर चर्चेचा विषय असतो. दिवाळीच्या दिवशी स्वतः शरद पवार (Sharad Pawar) आपल्या निवासस्थानी उपस्थित राहून कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना भेटण्यासाठी उपस्थित असतात. त्याप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांनी आज शरद पवारांची या ठिकाणी भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या कार्यक्रमासाठी गैरहजर होते. मात्र अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी यावेळी शरद पवारांची भेट घेतल्याचे समजते.
सध्या राष्ट्रवादीमध्ये (Ncp) सुरु असलेलं गटातटाचे राजकारण पाहता यंदा गोविंद बागेत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अशात अजित पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली नाही. मात्र पार्थ पवार (Parth Pawar) हे गोविंद बागेत आले आणि त्यांनी शरद पवारांची भेट घेत कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. (Parth Pawar Meet Sharad Pawar)
उद्या काटेवाडीमध्ये (katewadi) भाऊबीजेचा कार्यक्रम अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या कार्यक्रमाला देखील संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित राहणार असल्यास बोललं जातंय. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील कुटुंबियांसोबत उपस्थित असल्याचे दिसून आले.
दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंब (Pawar Family) दरवर्षी एकत्र येत. यंदा देखील संपूर्ण कुटुंब एकसाथ आलं. सुप्रिया सुळेंनी यावेळेसचा फोटो देखील शेअर केला. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी जेवणासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. त्यात सुनेत्रा पवार म्हणजेच अजित पवारांच्या पत्नीही दिसल्या. मात्र अजित पवार फॅमिली फोटोत दिसले नाही. सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या सोशल मीडियावरील फोटोजची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.