Shahajibapu patil – शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu patil) हे आपल्या खास गावराण ठसकेबाज भाषा शैलीसाठी ओळखले जातात. महाविकास आघाडीची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला शहाजीबापू गेले होते. त्यावेळी काय झाडी.. काय डोंगर.. समद ओकेमध्ये आहे हा त्यांचा डायलॉग देशभर प्रसिद्ध झाला होता. तेव्हा पासून शहाजी बापू पाटील हे चांगेलच चर्चेत आले आहेत.
दरम्यान, अश्यातच आता शहाजी बापू पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (sanjy raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शहाजी पाटील यांनी निवडणुकांसाठी पुन्हा दंड थोपटले आहेत. आगामी विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत माझ्यासमोर कोणाचेही आव्हान नाही. मी हजारोंच्या मताधिक्क्याने 2024 मध्ये पुन्हा आमदार होणार आहे, असा दावा आमदार शहाजीबापू पाटलांनी केला.
सांगोला मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमानंतर आमदार शहाजी पाटील हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांचा देखील चांगलाच समाचार घेतला.
यावेळी ते म्हणाले, “राऊत हे राजकारणातील साप गोळी आहेत. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर संजय राऊत यांना नागडा करून त्यांचे वस्त्रहरण केले आहे, अशी घणाघाती टीका शहाजी पाटील यांनी केली. शिंदे सेनेने राजकारणाचं वस्त्रहरण केले, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याला आमदार पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.