अजितदादाच खऱ्या अर्थाने ‘मुख्यमंत्रिपद’ सांभाळतात

मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’मधील नावे आज जाहीर झाली. या शॅडो कॅबिनेटमध्ये एकूण 28 नेत्यांचा समावेश करण्यात आलं आहे. यात बाळा नांदगावकर, संदिप देशपांडे, अभिजित पानसे, नितीन सरदेसाई आणि अमेय खोपकर यांचाही समावेश आहे.


दरम्यान, महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता ‘शॅडो’ कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरू नये, असा टोला शिवसेनेनं मनसेला लगावला आहे. यालाच मनसे नेते संदिप देशपांडे यांनी  सणसणीत उत्तर दिलं आहे.

संदिप देशपांडे यांनी ट्विट केले आहे की,’मुख्यमंत्रिपद अजितदादाच खऱ्या अर्थाने सांभाळत असल्यामुळे खरे मुख्यमंत्री दहा ते पाचच काम करतात, असं म्हणत संदिप देशपांडे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. एकही महत्वाचं खातं नसलेले महाराष्ट्रातले पाहिले मुख्यमंत्री सध्या शॅडो म्हणूनच काम करतायत त्यामुळे शॅडो मुख्यमंत्रिपद देऊन वेळेचा अपव्यय कशासाठी असा विचार राजसाहेबांनी केला असावा, असं संदिप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.