मुंबई – बॉलिवूडमध्ये सध्या ख्रिसमस वेव असल्याचे पाहायला मिळते. नाताळनिमित्त बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये पार्टी,फॅमिली गॅदरिंगची चांगली लगबग सुरु झाली आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने पुष्पा फेम रश्मिका मंदान्नाने तिचा ख्रिसमस ट्रीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. चाहते देखील तिच्या या फोटोला भरभरून प्रेम देताना दिसत आहेत.
View this post on Instagram
यासह अभिनेत्री करिश्मा कपूरने देखील ख्रिसमसची आपली तयारी दाखवणारा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या पाळीव कुत्र्यासह ख्रिसमस टोपी घालून बसलेली पाहायला मिळते. करिश्माने आपल्या इंस्टावरून हा फोटो शेअर केला आहे. यासोबतच ख्रिसमस कुकीज आणि कॉफी असं कॅप्शन दिले यावेळी दिले आहे.
View this post on Instagram
या खास सेलिब्रेशनमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत ख्रिसमसचा एक फोटो शेअर केला. मेरी ख्रिसमस आणि खूप प्रेम, अशा आशयाचे कॅप्शन यावेळी तिने आपल्या फोटोला दिले आहे. एकूणच संपूर्ण बॉलीवूडमध्ये नाताळ निमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनिल कपूर यांनी देखील आपल्या संपूर्ण कुटुंबाला नाताळ निमित्त पार्टी दिल्याचे समजते.
View this post on Instagram