मुंबई – साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘पुष्पा 2’ चा टीझर गेल्या महिन्यात रिलीज झाला आहे. अॅक्शन पॅक्ड पॅन इंडिया हा चित्रपट या वर्षी किंवा येत्या वर्षभरात प्रदर्शित होईल. पण चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याआधीच चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘पुष्पा 2’ चा टीझर रिलीज केला आहे. यासोबतच या चित्रपटाचे एक पोस्टरही रिलीज करण्यात आले होते, ज्यामध्ये अल्लू अर्जुन अतिशय विचित्र लूकमध्ये दिसत आहे.
‘पुष्पा’ने गळ्यात लिंबाचा हार, फुलांचा हार आणि वजनदार दागिने घातले आहेत. बोटात खूप जड अंगठ्या, हातात बांगड्या, निळी साडी आणि ब्रोकेड ब्लाउज नाकात नथ आणि निळा रंग अंगावर आणि चेहऱ्यावर लावलेला. एका हातात रिव्हॉल्व्हरही दिसत आहे. आणि उभं राहण्याची शैली अगदी जुन्या ‘पुष्पा’सारखी दिसली.
सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु असून, नुकतंच या सिनेमाबद्दल आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीने पुष्पाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आल्याने प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. हा चित्रपट 2 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर यापूर्वीच रिलीज झाला असून त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.