अकोले – अकोले तालुक्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकरच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या तालुक्यातील ग्रामसेवकांची व लग्नातील घटकांची बैठक घेऊन हे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना राबवू, अशी ग्वाही आ.डॉ.किरण लहामटे यांनी दिली.
स्नेहालय युवा निर्माण, उडान प्रकल्प व रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीने अकोले येथे बालविवाह जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. नगरहून आलेल्या बालविवाह जागृती सायकल रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. उडान प्रकल्प अंतर्गत अकोले शहरातून बालविवाह जागृती व्हावी म्हणून प्रभात फेरी काढण्यात आली.
अकोले येथील बसस्थानकामध्ये नागरिकांमध्ये बाल विवाह रोखण्याच्या दृष्टीने रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विदयार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्यास उपस्थित जनतेने व प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर अकोले महाविद्यालय येथे महाविद्यालीन तरुणीसमोर पथनाट्य सादर केले. बालविवाहाचे तोटे तरुणींना सांगून ज्या ठिकाणी बालविवाह होत असेल त्या ठिकाणी बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात आले. या पथनाट्यसही कॉलेज युवतींनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी सांस्कृतीक कार्यक्रम, बेटी बचाव, बेटी पढाव अभियानाचे महत्व सांगितले.
डॉ. संदीप कडलग, अकोले तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ वसंतराव मनकर, युवा नेते महेशराव नवले, साऊ महिला संस्थेच्या संयोजिका प्रतिभा कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास सोनवणे, रोटरी क्लब अकोले सेंट्रलचे अध्यक्ष सुनील नवले, सेक्रेटरी प्रा.विद्याचंद्र सातपुते, खजिनदार दिनेश नाईकवाडी, माजी अध्यक्ष सचिन आवारी, सचिन देशमुख, सचिन शेटे,प्रा.डॉ. सुरिंदर वावळे,डॉ. असिफ तांबोळी
सायकल असोसिएशनचे काळे, अमित वैद्य, उडान प्रकल्प समन्वयक प्रदीप कदम, विकास सुतार,रोटरी क्लबचे नितीन थाडे, असुलता थाडे, नंदाताई पांडुळे, उषा ताई शिंदे, सौ. उषा खोल्लम, बबलुशेठ पंजाबी आदिसह अनेक मान्यवर, सहभागी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या सायकल रॅलीमध्ये 35 मुली व 25 मुले यांनी सहभाग घेतला.सूत्रसंचालन डॉ. संदीप कडलग यांनी तर आभार रोटरीचे सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते यांनी मानले.