नगर -शनिवारी (दि.7) विद्युत वाहिनीवरील दुरुस्तीच्या कामासाठी महावितरण कडून शटडाऊन घतले जाणार असल्याने शहर व उपनगराचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत होणार आहे.
शनिवारी (दि.7) नागापूर, बोल्हेगाव, पाईपलाइन रोड, गुलमोहोर रोड, मुकुंदनगर, निर्मलनगर, लक्ष्मी नगर, सूर्यनगर, बुरुडगाव रोड, सारसनगर, केडगाव, कल्याण रोडवरील शिवाजी नगर या भागास रविवारी (दि.8) पाणीपुरवठा होईल.
सिध्दार्थ नगर, लालटाकी, आनंदी बाजार, दिल्लीगेट, तोफखाना, नालेगाव, चितळेरोड, खिस्तगल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, बालिकाश्रम रोड, सावेडी या भागाला दि. 8 ऐवजी दि. 9 ला पाणीपुरवठा केला जाईल.मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडिगेट, धरती चौक, बंगाल चौकी, कोठी, गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल, प्रेमदान, आगरकर मळा, विनायक नगर या भागाला दि. 9 ऐवजी मंगळवारी (दि.10) पाणीपुरवठा केला जाणार आहे.