नगर – बॅंकींग परवाना रद्द होऊन तीन आठवडे झाले तरी नगर आर्बन बॅंकेवर अजून अवशायक नेमाला गेला नसल्याने अखेर ठेवदारांनी ठेव सरक्षण कायद्याचा आधार घेण्याचे ठरवले आहे. यासाठी प्रत्येक ठेवीदाराकडून अर्ज भरून घेण्यास काम सुरु आहे. चार दिवसात आमच्या ठेवींचे पैसे मिळाले नाही तर ठेव संरक्षण कायद्यांतर्गत बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह संचालकांविरूद्ध कारवाईची मागणी केली जाणार आहे.
नगर अर्बन बॅंकेचा बॅंकींग व्यावसायाचा परवाना रद्द करण्याची कारवाई मागील 4 ऑक्टोबरला रिझर्व बॅंकेने केली. त्यानंतर संचालक मंडळाने केंद्रीय सहकार निबंधकांकडे या कारवाईविरूद्ध अपिल केल्याचे सांगितले जात आहे. तसेच अपिलाच्या निर्णयापर्यंत अवसायक नेमला जाऊ नये अशी मागणी केल्याचे समजते. मात्र, अजून असे अपिल दाखल करण्यास व बाजू मांडण्यास संचालकांना तारीख मिळाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
=============