पुणे – खासगी बस वाहतूक, ट्रॅव्हल्सकडून सणाच्या काळात अवास्तव प्रवास भाडे आकारले जात आहे. ही आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या बेकायदा भाडेआकारणी विरोधात कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आले. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, संजय बालगुडे, प्रशांत सुरसे, शाबीर खान, चेतन अग्रवाल, प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, प्रवीण करपे, सुरेश कांबळे, ऍड. अनिल अहिर, सुरेश राठोड, प्रकाश जगताप, राजु घाटोळे, ऍड. निलेश गौड, स्वाती शिंदे, अंजली सोलापुरे, मोना गायकर आदी उपस्थित होते.
प्रशासनाने संबंधितांवर योग्य वेळेत कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, तसेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांमार्फत “स्टिंग ऑपरेशन’ केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.