पाथर्डी -खरवंडी येथे सकल मराठा समाजातर्फे एसटीवरील सरकारी जाहिरातीमध्ये असलेल्या नेत्यांच्या फोटोला काळे फासून मराठा समाजाला आरक्षण द्या मगच जाहिरात करा, अशी भुमिका मांडत मराठा महासंघाचे अध्यक्ष अंबादास जगताप यांनी चार बसगाड्यावरील जाहिरातीला काळे फासले.
अंबादास जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी खरवंडी येथे येणाऱ्या प्रत्येक एसटी बसवरील जाहिरातील फोटोला काळे फासण्यास सुरवात केली होती. चार बसगाड्यावरील जाहिरातीला काळे फासण्याचे काम केले. त्यानंतर एसटीबसच आली नाही.
अतिशय शांततेत जगताप यांनी त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचविल्या आहेत.आम्ही कायदा हातात घेणार नाहीत, मात्र आमच्या मुलांना आरक्षण मिळावे हा आमचाही हक्क आहे. सरकारने तो दिला पाहीजे. अन्यथा मराठा समाज केवळ गाव बंद करुन थांबणार नाही. जरांगे यांच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर मग त्याला राज्श व केंद्रांचे सरकार जबाबदार असेल असे जगताप म्हणाले.