राहाता – तालुक्यातील उद्धव ठाकरे यांचे शिवसेना गटाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी खा. सदाशिव लोखंडे, तसेच जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याला साथ देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती विजय काळे पाटील यांनी दिली.
खा. लोखंडे यांच्या निवासस्थानी राहाता तालुका उपप्रमुख शिवसेना (उद्धव गट) आशिष गाडेकर, अरुण गुळवे (गणप्रमुख), सोमनाथ काकडे आदींनी खा. लोखंडे, जिल्हाप्रमुख कोते व जिल्हा संघटक काळे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.