जामखेड – भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तालुक्यातील जवळा येथील नसीमा शेख यांची, तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी हबीब शेख यांची निवड झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तय्यब बेग यांनी या निवडीचे पत्र दोघांना दिले आहे.
हबीब शेख हे गेल्या २० वर्षांपासून आ. प्रा. राम शिंदे यांचे समर्थक मानले जातात. हबीब शेख यांनी यापूर्वी अल्पसंख्याक आघाडीचे जामखेड तालुकाध्यक्ष म्हणून, तसेच जिल्हा सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे. मौलाना आझाद सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हबीब शेख यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
आ. राम शिंदे यांनी माझ्यासह पत्नीवर भाजप जिल्हा कार्यकारिणीत महत्त्वाचे स्थान देऊन खूप मोठा विश्वास टाकला आहे. तो मी सार्थ ठरवणार असून, पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे, असे हबीब शेख यांनी सांगितले.
या निवडीबद्दल खा. सुजय विखे-पाटील, आ. प्रा. राम शिंदे, भाजपचे विधानसभाप्रमुख रवींद्र सुरवसे, माजी सभापती डाॅ. भगवान मुरूमकर, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, तालुकाध्यक्ष अजय काशीद , डाॅ. अल्ताफ शेख यांनी दाम्पत्याचे अभिनंदन केले आहे.