पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोडचा प्र्कल्पाला गती आहे. पहिल्या टप्प्यात प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात सोलू, निरगुडे ते वडगाव शिंदे या पाच किलोमीटराच्या रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. यासाठी भूसंपादनासाठी प्रस्ताव पीएमआरडीएने जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी वडगाव शिंदे ता. हवेली या गावातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
पीएमआरडीएने प्रारुप विकास योजनेतील 65 मीटर रुंदीचा आणि 128 किलोमीटर लांबीचा रिंगरोड प्रक्रिया हाती घेतला आहे.
प्रस्तावित रिंगरोड हा आठ पदरी असणार आहे. एकूण 128 किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड असला, तरी त्यापैकी सुमारे 88 किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे काम पीएमआरडीएकडून करण्यात येणार आहे. उर्वरीत चाळीस किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे काम हे एमएसआरडीसीकडून करण्यात येणार आहेत.
तर 5.70 किलोमीटर लांबीच्या रिंगरोड महापालिकेच्या हद्दीतून जात असल्यामुळे ते काम महापालिकेकडून केले जाणार आहे. वडगाव शिंदे येथील चार गटातून हा रिंगरोड जात असून याबाबतचेआराखडे जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकारी क्र्मांक 26 या कार्यालयात उपलब्ध करून दिले आहे.