पाथर्डी – येथील मा. आ. स्व. माधवराव निऱ्हाळी खुले नाट्यगृह येथे उद्या (मंगळवार) माजी आ. स्व. राजीव राजळे यांनी सुरू केलेल्या हास्यकवी संमेलनाचे सालाबादप्रमाणे यावर्षीही राजीव राजळे मित्र मंडळातर्फे आयोजन करण्यात आले आहे. या कवी संमेलनात वात्रटीकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी प्रा. फ. मुं. शिंदे, विट्ठल वाघ (अकोला), प्रशांत मोरे (कल्याण), प्रशांत केंदळे (नाशिक),
अनिल दीक्षित (पुणे), इंद्रजित घुले (मंगळवेढा), अरुण म्हात्रे (ठाणे), भारत दौंडकर (शिरूर-पुणे), साहेबराव ठाणगे (पारनेर), शिवाजी सातपुते (मंगळवेढा), बालिका ज्ञानदेव (पुणे) आदी हास्यकवी सहभागी होणार आहेत. हे हास्यकवी संमेलन सायंकाळी ७ वा. होणार आहे. या खुमासदार हास्यकवितांचा आनंद रसिक प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन राजीव राजळे मित्र मंडळ व आदि फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.