मंचर – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील विद्या विकास मंदिरच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था – पुणे यांच्याकडून राष्ट्रीय राजभाषा हिंदी रत्नपुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, अशी माहीती विद्यालयाचे प्राचार्य अंकुश शिंगाडे यांनी दिली.
विद्यालयात महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था, पुणे या संस्थेमार्फत 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांची अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला 9 वी चे 148 विद्यार्थी व 10 वी चे 78 विद्यार्थी असे 226 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले.
पुरस्कारप्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे – सिद्धी फदाले, प्रणाली कराळे (9 वी), सुदर्शन प्रभाकर शेळके, कल्याणी खेडकर(10वी), त्याचप्रमाणे विद्यालयामध्ये अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था, पुणे या संस्थेकडून विद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य अंकुश शिंगाडे यांना आदर्श प्राचार्य पुरस्काराने आणि राजभाषा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे शिक्षक हिंदी विभाग प्रमुख शशिकांत गावडे यांना आदर्श राजभाषा शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले, अशी माहीती पर्यवेक्षिका माधुरी खानदेशे यांनी दिली.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक शशिकांत गावडे , रमेश वैरागर , अंकुश टाव्हरे , सुरेश जारकड , कविता गावडे यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, कार्याध्यक्ष गणपतराव हिंगे, सचिव वसंतराव हिंगे, ज्येष्ठ विश्वस्त शांतारामबापू हिंगे, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश मेंगडे, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांनी अभिनंदन केले आहे.