Ahmedabad Vadodara Express Highway Accident: गुजरातच्या अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची हृदय पिळवटून टाकणारी छायाचित्रे समोर आली आहेत. वडोदराहून अहमदाबादला जात असलेली कार ट्रेलरला धडकल्याने हा भीषण अपघात घडला. या कार अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Gujrat Car Accident#gujratnews pic.twitter.com/V85xBYZzAw
— Jai Hind 🙏🇮🇳 (@Jaihind1547) April 17, 2024
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. या अपघातात कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून रस्त्याच्या दुतर्फा रक्ताचे लोट दिसत आहेत. कार समोरून ट्रेलरमध्ये घुसली. त्यामुळे कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. अपघातातील जखमींची संख्या अद्याप समजू शकलेली नाही.
Ahmedabad Vadodara Expressway Car Accident pic.twitter.com/B0IFX5V7sv
— Jai Hind 🙏🇮🇳 (@Jaihind1547) April 17, 2024