अघोरी ! पती लैंगिक दृष्ट्या कमजोर, तरी मुल होण्यासाठी सासरच्यांनी सुनेला पाजलं कोंबडीचं रक्त

पुणे – घर बांधण्याकरिता विवाहितेकडे पैशांची मागणी करुन तिला भाेंदूबाबाचे सांगण्यावरुन काेंबडीचे रक्त पाजून तिला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नावेळी विवाहितेस अभियंता असल्याचे खाेटे सांगून पतीने फसवणुक केल्याने पतीसह सासरच्यांवर भाेसरी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती अमित सुदाम वाघुले (वय-३३), सासरा सुदाम श्रीपती वाघुले (६२), आणि सासू संध्या वाघुले (५३) यांचे विराेधात याप्रकरणी भाेसरी पाेलीस ठाण्यात विनयभंग, स्त्री अत्याचार व जादूटाेणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार डिसेंबर २०१८ ते जून २०२१ यादरम्यान घडला आहे.

संबंधित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तीन वर्षापूर्वी संबंधित महिलेचे अमित वाघुले याच्याशी लग्न झाल्यानंतर ती पतीसह सासरी राहत हाेती. लग्नावेळी अमितने अभियंता असल्याचे सांगितले परंतु नंतर त्याचे पदवी पर्यंतचे ही शिक्षण पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले. लैंगिक दृष्टया पती सक्षम नसल्याचे माहिती असून सुध्दा सासरचे व्यक्तींने त्याचे विवाहितेशी लग्न लावून दिले. सासऱ्याने तिला जवळ अाेढून विनयभंगचा प्रकार केला.

याबाबत तिने तिच्या माहेरी तक्रार केली असता, तिला सासरचे व्यक्तींनी मारहाण करत शारिरिक व मानसिक छळ केला. रत्नागिरी येथे घर बांधण्यासाठी पैशांची मागणी तिच्याकडे करत खेड तालुक्यातील कनेरसर येथील एका भाेंदूबाबाचे सांगण्यावरुन तिला सासरचे व्यक्तींनी बळजबरीने काेंबडीचे रक्त पाजण्यास दिले

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.