वाघोली – पेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रुपेश ठोंबरे व माजी उपसरपंच निलेश वाळके यांच्यासह पंधरा तरुण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली येथे प्रवेश केला असल्याची माहिती हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शितोळे यांनी दिली.
आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समित्या यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून पेरणे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच रुपेश ठोंबरे व माजी उपसरपंच निलेश वाळके यांच्यासह इतर पंधरा जणांनी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्या संजीवनी कापरे, हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा लोचन शिवले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते प्रदीप वसंत कंद, माधुरी वाळके, साईनाथ वाळके, मधुकर वाळके सर, शांताराम टुले, राजेश वारघडे, दत्तात्रय गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यापुढील काळात जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष योगेश शितोळे यांनी दिली.