दुधवाल्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! व्यापाऱ्याचे सापडलेले 2 लाख रूपये केले परत

करमाळा – उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथील एका व्यापाऱ्याची दोन लाख रूपयांची सापडलेली बॅग दुधवाल्याने परत केली. दुध विक्रेते सुनील रामचंद्र मारडकर यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

व्यापारी राजेश नारायण तालापल्ली यांची रविवारी (ता. 19) दुपारी 1 वाजताच्या सुमारास प्रवास करत असताना दोन लाख रुपये असलेली बॅग हरवली होती. त्यानंतर व्यापारी तालापल्ली यांनी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून वेळ न दडवता तपास सुरु केला. तपास करत असताना एका दूधवाल्याला ही पैशाची बॅग सापडली असल्याचे समजले. दूधवाले मारडकर हेही संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी सर्वच्या सर्व रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली. पैसे परत मिळताच तालापल्ली यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तालापल्ली यांनी मारडकर यांचे आभार मानून दहा हजार रुपये बक्षीस म्हणून दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.