मुंबई: इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर सातत्याने विश्रांती घेत असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुढील वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेद्वारे भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी दिले आहेत.
पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत धोनीला खेळायचे असून त्यासाठीच त्याने आतापासूनच सराव सुरू केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपाठोपाठ धोनीने मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही धोनीने माघार घेतली होती.