Mahendra Singh Dhoni : भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) त्याच्या खेळासह साध्या राहणीमानामुळे जास्त ओळखला जातो. अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत त्याने मोठे यश संपादन केले आहे. धोनीने त्याच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो आपल्या पाळीव प्राण्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करताना दिसत होता, ज्याला पाहून सर्वांनी माहीचे कौतुक केले. पण सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून सर्वांनाच धक्का बसला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी ‘हुक्का’ ओढताना दिसत आहे. यात माही लांब केसांचा लूक असलेल्या सूटमध्ये दिसत आहे. त्याच्या काही लोक असल्याचेही पाहायला मिळत आहे. धोनीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
. Dhoni setting a wrong example to youthspic.twitter.com/ZHMTKMI8Mp
— Kolly Censor (@KollyCensor) January 6, 2024
धोनीचा हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, काही चाहत्यांनी धोनीवर जबरी टीकाही केली. काहींना, अजूनही हा व्हिडिओ माहीचा नसल्याचे वाटते. तर, काहींनी धोनीच्या समर्थनार्थही भूमिका मांडली आहे. चेन्नई सुपर किंग्सने गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल 2023 मध्ये विजेतेपद पटकावले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK संघ 2023 मध्ये पाचव्यांदा IPL चॅम्पियन बनला. धोनीने संपूर्ण हंगामात संघासाठी काही शानदार फिनिशिंग इनिंग खेळल्या होत्या. एमएस धोनीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 250 आयपीएल सामने खेळले आहेत.