जळोची (वार्ताहर) – बारामती नगरपालिकेने (दि.18) मार्च रोजी घरकुलासंदर्भात नागरिकांना विश्वासात न घेता ठराव केला आहे. त्यास वित्तीय संमती दिली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सचिन जगताप यांनी उपोषण सुरू केले होते. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी घरकुलासंदर्भात नागरिकांना विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर जगताप यांनी उपोषण स्थगित करण्यात आले.
जगताप हे ठरावाविरोधात (दि.30) जुलैपासून उपोषणास बसले होते. तिसऱ्या दिवशी जगताप यांची प्रकृती खालावल्याची वृत्त सर्वत्र पसरले. नागरिकांनी उपोषणस्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली. तावरे यांनी उपोषणकर्ते जगताप यांची भेट घेत लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्यास विनंती केली. यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.