पणजी – गोव्यात उद्या सोमवारी एकाच टप्प्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान होंत आहे. या मतदानाच्या पुर्व संध्येला एका वृत्तवाहिनीवर प्रसारीत झालेल्या एका स्टींग ऑपरेशनवरून तृणमुल कॉंग्रेस व आम आदमी पक्षांमध्ये जोरदार जुंपली असून त्यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
या निवडणुकीत विजय मिळाल्यास तृणमुल कॉंग्रेसच्या एका कॉंग्रेसच्या तीन आमदारांनी पक्ष बदलण्यासाठी लाच घेतल्याचे एक स्टींग ऑपरेशन एका वृत्तवाहिनीने प्रसारीत केले आहे. आम्ही या स्टींग ऑपरेशन संबंधात मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे अशी माहिती आप पक्षाचे पणजी येथील उमेदवार वाल्मिक नाईक यांनी दिली.
तृणमुल कॉंग्रेसचे बेनालिम मतदार संघातील उमेदवार चर्चिल आलेमाव यांनीही या प्रकरणात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. या व्हिडीओ मध्ये चर्चिल आलेमाव यांनीही लाच घेतल्याचे दिसत आहे असे सांगण्यात येते. आम आदमी पक्ष आणि संबंधीत टीव्ही चॅनेलच्या विरोधातही त्यांनी तक्रार दिली आहे. आलेमाव म्हणाले की निवडणुक प्रचाराची मुदत संपल्यानंतर जी शांतता निर्माण झाली आहे त्याचा वापर करून आम आदमी पक्षानेच हा खोडसाळपणा केला आहे.
तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्या सुष्मिता देव यांनीही आम आदमी पक्षाच्या अतिशी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. हा व्हिडीओ आम आदमी पक्षाने सोशल मिडीयावर प्रसारीत केला आहे. तो त्वरीत काढून टाकावा अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान या प्रकरणी लोक प्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.