नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 78 उमेदवारांची यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाने बबिता फोगट आणि योगेश्वर दत्त यांनाही उमेदवारी दिली आहे. कुस्तीपटू बबीता फोगट आणि योगेश्वर दत्त नुकतेच भाजपमध्ये सामील झाले होते.
BJP releases its first list of 78 candidates for #HaryanaAssemblyPolls. https://t.co/lxbhbqQA3J pic.twitter.com/ieueZ4d4Ip
— ANI (@ANI) September 30, 2019
भाजपने दादरी येथून बबिता फोगट आणि सोनीपतच्या बडोदा येथून योगेश्वर दत्त यांना उमेदवारी दिली आहे. या यादीमध्ये 38 विद्यमान आमदारांना सुद्धा तिकिटे देण्यात आली आहेत, तर 7 आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. हरियाणा विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
BJP releases its first list of candidates for Haryana Assembly elections. Wrestler Yogeshwar Dutt to contest from Baroda, Ex-hockey captain Sandeep Singh from Pehowa, and wrestler Babita Phogat to contest from Dadri, Haryana CM ML Khattar to contest from Karnal. pic.twitter.com/yMIHwpezkI
— ANI (@ANI) September 30, 2019