मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांचे ब्रेकअप झाल्यापासून दोघेही चर्चेत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्रीने रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याची घोषणा केली होती. रोहमन शॉलने देखील अभिनेत्रीची ही पोस्ट रिपोस्ट करत दोघांच्या विभक्त होण्याबद्दल लिहिले होते. जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे वेगळे झाले.
View this post on Instagram
मात्र, आता पुन्हा एकदा सुष्मिता आणि रोहमन सोबत दिसले आहे. यावेळी रोहमन सुष्मिताला गर्दीपासून वाचवताना दिसला. यानंतर सोशलवर सुश्मिताच्या फॅन्सच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.
सुष्मिता सेनने एक्स बॉयफ्रेन्ड रोहमन पॉलसोबत ब्रेकअपची घोषणा केली होती. ती असंही म्हणाली होती की, जेव्हा एखादी पब्लिक फिगर असते तेव्हा त्याच्याशी संबंधित लोकही लोकांच्या डोळ्यात येतात. ती व्यक्ती तिथे आहे कारण तुम्ही त्याला तिथे आणले आहे. त्यामुळे त्याच्या जीवनासाठी ते योग्य नाही. तसेच तुम्ही प्रत्येकाच्या भावनांना चिकटून राहणे आणि हे नाते आहे असे समजणे हे तुमच्या जीवनासाठीही योग्य नाही.’