अकोला – अकोला शहरातील बाभूळगाव येथे आईने पोटच्या 13 महिन्याच्या चिमुकलीची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली आहे. त्यानंतर आईनेही हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. घरगुती भांडणातून महिलेने हे टोकाचे पाऊन उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रियंका उमेश बोबडे असे महिलेचे नाव असून अधिरा असे हत्या करण्यात आलेल्या चिमुकलीचे नाव आहे. महिलेवर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिलेच्या पतीने तक्रार दाखल केली असून महिलेविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.