मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूर ही नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी करिश्मा आणि करिना मालदीव येथे गेल्या होत्या. करिश्माने तिच्या मालदीव वेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यात दोघी बहिणी समुद्राच्या किनाऱ्यावर उभ्या आहेत. मात्र करिश्माने शेअर केलेल्या तिच्या आणि करिनाच्या फोटोला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
करिश्माने शेअर केलेल्या फोटोमधील करिनाच्या चेहऱ्याच्या रंगाने अनेकांचे लक्ष वेधले. या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘करिनाचा चेहरा एवढा लाल का झाला आहे?’, तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘करिनाचा चेहरा हा लाल टोमॅटोसारखा दिसत आहे.’ काही दिवसांपूर्वी करिना आणि करिश्माला त्यांच्या एअरपोर्टवरील नाइट सूटमधील लूकला देखील नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते.
करिनाचा लाल सिंह चड्ढा हा आगामी चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये करिनासोबतच आमिर खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच करिना लवकरच ओटीटीवर देखील पदार्पण करणार आहे.
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर करिनाचा आगामी चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये करिनासोबतच पाताल लोक फेम अभिनेता जयदीप अहलावत आणि विजय वर्मा हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.