मुंबई – बॉलीवूडमधील सर्वात स्टायलिश स्टार किड्सपैकी एक मानली जाणारी न्यासा देवगण अनेकदा तिच्या व्हायरल पार्टी फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. अलीकडेच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये न्यासा ग्रीसमधील एका पार्टीत डान्स करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये न्यासा देवगन खूपच सुंदर दिसत आहे. लोकांना तिचा क्लासिक पोशाख देखील खूप आवडला आहे, ज्यामध्ये ती नृत्य करताना खूप ग्लॅमरस दिसते आहे. दुसरीकडे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक तिच्यावर टीका करत आहेत की, ती तिचे वडील अजय देवगणच्या पैशावर एन्जॉय करत आहे आणि पार्टी करत आहे.
सोशल मीडियावर न्यासाच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘वडिलांच्या पैशावर ऐश’. तर दुसरीकडे एका यूजरने तिला करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आणि शेवटी एका यूजरने ‘बोलो जुबान केसरी’ असे लिहिले आहे. अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण तिच्या हॉट आणि सिझलिंग फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते, हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात.
याआधीही न्यासा देवगनच्या फॅन पेजवर काही छायाचित्रे पाहण्यात आली होती, ज्यामध्ये ती स्पेनमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत साईटसीइंग आणि क्लबिंग करताना दिसली होती. ही छायाचित्रे सर्वप्रथम ओहान अवत्रामणीने सोशल मीडियावर शेअर केली होती, जो जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड देखील आहे.