कोपरगाव – वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षेचा (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-नीट यूजी 2023) निकाल काल जाहीर झाला. यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी अफशिन रियोजोद्दीन शेख हिने 720 गुणांपैकी 656 गुण म्हणजे 99.73 पर्सेंटाईल मिळवून कोपरगाव तालुक्यात सर्व प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान मिळविला.
देश पातळीवर 20 लाख 38 हजार 596 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यातून अफशिन शेखचा देशपातळीवर 5315 गुणानुक्रमांक आहे. याच परीक्षेत संजीवनीच्या मोनिका लाडुराम बिष्णोईने 97.44, हर्षल वाल्मिक निळकंठने 97.03,पांडुरंग शिवाजी कोळपे याने 96.51, तेजस विकास चौधरी व महिमा महेश वहाडणे यांनी प्रत्येकी 93.15, सायली संजय कोरडे हिने 86.86 व गौरी विक्रम भोरकडे हिने 84. 83 पर्सेंटाईल गुण मिळवून प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडविले.
याबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. या यशाबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे व त्यांच्या सर्व टीमचेही अभिनंदन केले आहे.
“एमबीबीएसला प्रवेश मिळवून गोरगरीब रुग्णांची सेवा करावी, ही माझ्या आई-वडिलांची शिकवण होती. परंतु, त्यासाठी नीटची पात्रता परीक्षा पात्र होणे गरजेचे असते. कोणत्याही खासगी शिकवणीला न जाता, नीटचे मार्गदर्शन कोणत्या कॉलेजमध्येच मिळेल, याचे उत्तर आम्हाला मिळाले ते म्हणजे संजीवनी ज्युनिअर कॉलेज. खरोखरच ते सत्यात उतरले आणि मला 99. 73 पर्सेन्टाईल मिळाले. आता मी माझ्या आई-वडिलांचे व माझेही स्वप्न पूर्ण करू शकणार आहे, हे केवळ संजीवनीमुळेच शक्य झाले,” असे अफशीन शेख म्हणाला.