फलंदाजांजीत सुधारणा करण्याचे दोन्ही संघांसमोर लक्ष्य
स्थळ – कार्डिफ
वेळ – दु. 3.00 वा
कार्डिफ – आपापल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे संघ आज समोरासमोर असुन यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील आपला पहिला विजय मिळवण्यस दोन्ही संघ उत्सुक असुन आजच्या सामन्यात आपल्या फलंदाजीत सुधारणा करण्याचे लक्ष्य दोन्ही संघांसमोर असणार आहे.
विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरूवात दोन्ही संघांनी पराभवाने केली असली तरी अफगाणिस्तानच्या संघाने आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला चांगलीच झुंज दिली होती. तर, दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाने न्युझीलंड विरुद्धचा सामना एकतर्फी गमावला होता. यावेळी दोन्ही संघांच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याने गोलंदाजांना त्यांची भुमिका पाएर पडण्यात अपयश आले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात ज्या संघाचे फलंदाज चांगली कामगिरी करतील तो संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरेल हे नक्की.
न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाला 29.2 षटकांत सर्वबाद 136 धावांचीच मजल मारता आली होती. यावेळी संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने एकाकी किल्ला लढवताना नाबाद 52 धावांची खेळी केली होती. मात्र, त्याच्या व्यतिरीक्त तब्बल 8 फलंदाज एकेरी धावांची मर्यादा देखील ओलांडू शकले नव्हते. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला निर्धारीत 50 षटकेही फलंदाजी करता आली नव्हती. तर, प्रत्युत्तरात खेळताना न्युझीलंडने हे आव्हान केवळ 16.1 षटकांत बिनबाद 137 धावा करत पुर्ण केले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिऑळवायचा असल्यास श्रीलंकेच्या संघातील फलंदाजांना आपल्या कामगिरीत भरपुर सुधारणा करणे गरजेचे आहे.
तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला असला तरी ऑस्ट्रेलियन संघा विरुद्ध अफगाणिस्तानने 207 धावा करत आपल्या फलंदाजीतील चमक दाखवून दिली होती. यावेळी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियन फलंदाजांना विजय मिळविण्यासाठी 35 षटके झगडायला लावले होते. त्यावरुन अफगाणिस्तानच्या गोलंदाज आणि फलंदाजांमधिल प्रतिभा दिसून येते.
प्रतिस्पर्धी संघ –
अफगाणिस्तान संघ –
गुलाबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब आलम, अझगर अफगाण, दौलत झारदान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झईझई, मोहम्मद नबी, मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रहमत शाह, रशीद खान, समीउल्ला शिनवारी.
श्रीलंका संघ –
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डि सिल्व्हा, नुवान प्रदीप, अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, थिसारा परेरा, मिलिंदा सिरीवर्धने, लहिरु थिरिमाने, इसरु उडाना, जेफ्री व्हॅंडरसे.