जुन्नर -जुन्नर तालुक्यात रविवारी (दि.9) पाच करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 513 झाली आहे. ओतूर शहरात 3 तर काचळवाडी व परिटवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.
यापैकी 374 व्यक्ती उपचारानंतर घरी परतले तर उर्वरित 115 ऍक्टिव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. दि. 18 जुलै रोजी 145 ऍक्टिव्ह रुग्ण असलेल्या तालुक्यात आजअखेर केवळ 115 रुग्ण आहेत.
तर करोनाने आजअखेर 24 बळी घेतल्याची माहिती झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी दिली आहे.