पुणे – शहरात गेल्या काही दिवासांपासून उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी पुन्हा एकदा हजेरी लावली. गार वारा आणि पाऊस यामुळे शहरातील वातावरणात कमालीचा गारवा जाणवत आहे. दरम्यान, शिवाजीनगर वेधशाळेने रविवारी एक मिमी पावसाची नोंद केली आहे.
राज्याच्या बहुतांश भागातील मुसळधार पडत असलेला पाऊस पूर्णपणे कमी झाला असला, तरी मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. यामध्ये कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. रविवारी महाबळेश्वर येथे सर्वाधिक म्हणजे 34 मिमी पावसाची नोंद झाली आहे.