नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 278 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 74 हजार 842 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.65 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 327 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 441 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 159, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 150 आणि अँटिजेन चाचणीत 18 रुग्ण बाधित आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 42, अकोले 1, जामखेड 3, कर्जत 17, कोपरगाव 14, नगर ग्रामीण 3, नेवासे 3, पारनेर 15, पाथर्डी 1, राहाता 24, संगमनेर 16, शेवगाव 14, श्रीगोंदा 5, इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 47, अकोले 4, कर्जत 2, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 6, नेवासे 2, पारनेर 7, पाथर्डी 2, राहाता 27, राहुरी 6, संगमनेर 19, शेवगाव 7, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 13 आणि इतर जिल्हा 4, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 18 जण बाधित आढळून आले. मनपा 6, नेवासे 1, पारनेर 6, राहाता 1, राहुरी 1, संगमनेर 1, शेवगाव 1, श्रीगोंदा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 94, अकोले 11, जामखेड 2, कर्जत 6, कोपरगाव 17, नगर ग्रामीण 18, नेवासा 5, पारनेर 3, पाथर्डी 7, राहाता 27, राहुरी 10, संगमनेर 42, शेवगाव 18, श्रीगोंदा 8, श्रीरामपूर 4, कॅन्टोन्मेंट 3 आणि इतर जिल्हा 3, अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्णसंख्या : 74842
उपचार सुरू असलेले रुग्ण : 1441
जिल्ह्यातील मृत्यू : 1154
एकूण रुग्णसंख्या : 77437