तृणमूलच्या यादीत 114 नव्या चेहऱ्यांना संधी

कोलकाता, – तृणमूल कॉंग्रेस अध्यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 291 जागांसाठी उमेदरावारांची यादी जाहीर केली. ममता बॅनर्जी यांनी घोषित केलेल्या टीएमसीच्या या यादीत 114 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षाने 5 मंत्री आणि वर्तमान 28 आमदारांना तिकीट दिलेले नाही. यामुळे यादी जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरु केली आहेत.

कार्यकर्त्यांनी बाहेरील उमेदवार चालणार नाही असे पोस्टर लावले आहेत. तृणमूल कॉंग्रेसने मिदनापुर, चौबीस परगनासह काही जिल्ह्यात बाहेरील उमेदवार दिले आहेत.
आगामी निवडणुकांसाठी तृणमूलकडून 50 महिला उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय 27 नव्या चेहऱ्यांनाही यंदाच्या निवडणुकांमध्ये संधी देण्यात आली आहे. उमेदवारांच्या या यादीत 42 मुस्लिम उमेदरावांचाही समावेश आहे. रासबेहरी मतदारसंघातून देबाशीष कुमार हे निवडणूक लढवणार आहेत. तर, दिग्दर्शक राज चक्रवर्ती निवडणुकीसाठी उभे आहेत.

माजी फुटबॉलपटू विदेश बोस, अभिनेत्री सयानी घोष, अभिनेता सोहन चक्रवर्ती यालाही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.