पिरंगुट -मुळशीत आज 20 करोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली असून तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 680 झाली आहे. हिंजवडीत पाच, जांबेत सहा, मारुंजीत दोन, पिरंगुटमध्ये दोन, चांदेत एक, बावधनमध्ये एक, म्हाळुंगेत दोन, माणमध्ये एक रुग्ण आढळला आहे.
त्यातील 209 रुग्ण रुग्णालयात दाखल असून आजपर्यंत 450 रुग्णांना घरी सोडले आहे. आज 53 रुग्णांना घरी सोडले आहे. एका रुग्णांचा आज मृत्यू झाला असून तालुक्यातील एकूण मृतांची संख्या 21 झाली आहे.