जुन्नर -गेल्या पाच दिवसांपासून करोनाबाधित रुग्ण आढळण्याचे जुन्नर तालुक्यातील प्रमाण पुन्हा वेगाने वाढले होते; मात्र मंगळवारी (दि. 4) केवळ एक रुग्ण आढळून आल्यामुळे जुन्नरकरांना दिलासा मिळाला आहे. यामुळे बाधितांची संख्या 476 झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी दिली.
तालुक्यातील 476 करोनाबाधित रुग्णांपैकी 332 व्यक्ती उपचारानंतर बरे झाले असून 124 ऍक्टिव्ह आहेत. यापूर्वी तालुक्यातील 20 नागरिकांचा करोनाने बळी घेतला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश आगम यांनी दिली आहे.