पिरंगुट -मुळशी तालुक्यात नवीन 16 रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्ण संख्या 750 इतकी झाली आहे. आज हिंजवडीमध्ये एक, चांदेत एक, मारुंजी मध्ये एक, नेरेमध्ये एक, बावधनमध्ये दोन, भूगावमध्ये चार आणि पिरंगुटमध्ये सहा रुग्ण सापडले आहेत.
आतापर्यंत 588 रुग्ण सध्या रुग्णालयातून घरी परतले असून 139 रुग्ण उपचार घेत आहे. आज 13 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. आजअखेर एकूण 23 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.